Breaking News

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात नगरसेवकांचे उपोषण


शेवगाव प्रतिनिधी दि 17 - शेवगाव नगर परिषदेच्या कारभाराच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे व भाजपाचे दोन्ही पक्षांचे नगरसेवक शेवगाव नगर परिषदे समोर उपोषणास बसले होते. शेवगाव शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. सभागृहात वेळोवेळी ठराव होऊनही कुठल्याही स्वरूपाची कारवाई केली जात नाही, यामुळे शहरात नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झालेला आहे, तसेच शहरातील पोलवरील लाईट बर्‍याच दिवसांपासून बंद पडले असून ते टाकले जात नाहीत, पडून असून त्या कामाबाबत काम सुचवूनही व तसे ठराव होऊनही कुठलेही स्वरूपाचे काम मार्गी लावले जात नाही मुख्याधिकारी व अध्यक्ष यांच्या नाकर्तेपणामुळे शहर हे विकासापासून वंचित ठेवले जात आहे व जाणीवपूर्वक विकासकामांना खीळ बसली जात आहे तरी या समस्यांचे तात्काळ निवारण व्हावे अशी मागणी शेवगाव नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या दोन नगरसेवकांनी आज घोषणा केली तात्काळ या समस्यांचे निवारण व्हावे अशी मागणी शेवगाव नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या दोन नगरसेवकांनी केली. या मागण्यांसाठी आज शेवगाव शहरात नगर परिषदे समोर शिवाजी चौकात भाजपच्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी एक दिवसीय उपोषण केले. यावेळी भाजपाचे नगरसेवक अरुण मुंडे, सागर फडके, वजीर पठाण शब्बीर शेख,अजय भास्कर,गोटू फलके, दिगंबर कार्टे, अंकूश कुसळकर, भाऊसाहेब लिंगे, विनोद मोहिते, नितीन दहिवळकर, गणेश कोरडे इ.यावेळी उपोषणास बसले होते.