Breaking News

लोणीमध्ये विद्यार्थ्यांची आंबेडकर जयंती उत्साहात

प्रवरनगर प्रतिनिधी - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, अशी माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.

यावेळी स्वयंसेवक विक्रमसिंह पासले, शुभम राख, अक्षय आहेर, शनिदेव जाधव, प्रतिषा अभंग, प्रिया गवळी, सायली ढेरंगे, ऋतुजा भालेराव, अमोल गायकवाड, अमोल मिसाळ आदी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. देशाच्या राज्यघटनेवर तथा न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. आगामी काळात हे दुःखाचे ढगही सरतील, अशी अपेक्षा यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विक्रम पासले प्रास्ताविक केले. ऋतुजा भालेराव हिने आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा. से. यो.चे समन्वयक प्रा. प्रविण गायकर यांनी विशेष परिश्रम घेतले.