चांदा परिसरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
चांदा (प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती साजरी करण्यात आली.चांदा ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच सुवर्णलता कैलास अभिनव यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. या वेळी मराठा महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख संभाजीराव दहातोंडे , आर.पि.आयचे संजय वाल्हेकर , अशोक गाढवे , बाळासाहेब भोसले , बाबासाहेब अल्हाट, मराठा महासंघाचे ता.अध्यक्ष शाम पवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली व त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे असे सांगितले उपसरपंच बाळासाहेब जावळे, ता.भा.ज.प.उपअध्यक्ष कैलास दहातोंडे ,दत्तात्रय जावळे, किरण जावळे, देविदास पासलकर , भिवसेन गालफाडे ,सतीश गाढवे , संतोष गाढवे ,शरद गाढवे ,विजय धाडगे ,प्रवीण ससाणे ,अप्पा गायकवाड सुभाष शेंडे व आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. जवाहर विद्यालयात प्रथम डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या महान कार्याची माहिती यावेळी दिली. या प्रसंगी प्रा.चंद्रकांत दरंदले , उप.प्रा.ढवळे , पर्यवेक्षिका श्रीमती.शेरकर सर्व शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच जि.प.प्रा.शाळेत डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मुख्यध्यापक इंगळे यांनी पूजन करून पुष्पहार घातला व त्यांच्या कार्याची उपस्थित विद्यर्थ्यांना माहिती दिली . या वेळी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच अल्हाट वस्ती येथे चारी नं6 येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेला आर.पी.आयचे बाबासाहेब अल्हाट यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
