Breaking News

आंबडेकर जयंती निमित्त नेवासा शहरातील होणारे कार्यक्रम स्थगित - संजय सुखधान

डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंतीचे नियोजन करणारे घटनापती प्रतिष्ठानचे सदस्य विलास शेटे यांचे गुरुवारी रात्री अपघाती निधन झाल्याने शनिवार दि. 14 एप्रिल रोजी होणार्‍या जयंती मिरवणूकीसह आदी कार्यक्रम स्थगित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय सुखधान यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात कमानी उभारणे, मिरवणूकीसह इतर कार्यक्रमाचे नियोजन करणारे घटनापती प्रतिष्ठानचे क्रियाशील कार्यकर्ते विलास शेटे यांचे भानसहिवरा गावाजवळ गुरुवारी रात्री अपघातात निधन झाल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना मोठे दुःख झाले असल्याने सदर जयंती निमित्त आयोजित मिरवणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आले असून, याबाबत जयंतीनंतर निर्णय घेतला जाईल. तरी याबाबत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी असे संजय सुखधान यांनी सांगितले आहे.