Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात


जामखेड ता. प्रतिनिधी - जामखेड तालुक्यातील नान्नज येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमजद पठाण, शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले, अॉड अल्लाउद्दीन शेख, संरपच सौ विद्या मोहळकर, उपसरपंच तुळशिराम मोहळकर, डॉ, सर्जेराव मोहळकर, डॉ कुमटकर, दैनिक लोकमंथन चे पत्रकार समीर शेख, पुढारी चे पत्रकार लियाकत शेख, रिपाइंचे युवा नेते सतीश (नाना) साळवे, सुनिल हजारे, रिपाई मराठा आघाडीचे तालुका अध्यक्ष बालाजी राजेभोसले, अनिल भोसले, नितीन मोहळकर, अंकुश मोहळकर, नाना भवाळ, शरद साळवे, उदय पवार, सचिन सोनवणे, यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते