Breaking News

संगमनेरात आज ‘कँडल मार्च’

संगमनेर : देशभरात सध्या सुरु असलेल्या अल्पवयीन मुली आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या {दि. १७} सायंकाळी साडेसहा वाजता निषेध मोर्चा {कँडल मार्च} आयोजित करण्यात आला आहे, अशी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी दिली. त्या म्हणाल्या, की महिलांचा सन्मान करणे ही भारतीयांची संस्कृती आहे. मात्र सध्या देशात अल्पवयीन मुली व स्त्रियांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच उत्तर प्रदेशात उन्नाव येथे जम्मू काश्मिरमध्ये कठुवा आणि गुजरातमधील सूरत येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले. हे अत्यंत निंदनीय व वाईट कृत्य आहे. पुरोगामी महाराष्ट्रासह पुरोगामी संगमनेर तालुक्यात याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. महिला, नागरिक व युवतींनी या कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.