Breaking News

तणावमुक्त जीवन जगण्याची कला आवश्यक : डाॅ. वारे

जामखेड शहर प्रतिनिधी  - धकाधकीच्या जीवनात मानवाकडून आरोग्याकडे मोठे दुर्लक्ष होत आहे, ही बाब चिंतेची आहे. जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच लोकशाहीचा चौथा अधारस्तंभ असलेल्या पत्रकार बांधव सतत तणावाखाली असतात. या घटकाला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याबाबत सजग करणे महत्त्वाचे आहे.


या घटकाने तणावमुक्त जीवन जगण्याची कला आत्मसात करण्याची कला आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन एशियन नोबेल हाॅस्पिटलचे कार्डिओलजिस्ट डाॅ. धनंजय वारे यांनी व्यक्त केले.येथील प्रयोगवन परिवार आणि जामखेड तालुका डाॅक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार व मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जामखेड तालुका डाॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ अविनाश पवार होते. यावेळी डाॅ. प्रताप गायकवाड, डाॅ. प्रकाश खैरनार, डाॅ. सचिन काकडे, हनुमंत काळे, निलेश शिंदे, डाॅ. जतीन काजळे, डाॅ. सिताराम ससाणे, डाॅ. सुशिल पन्हाळकर, डाॅ. पांडूरंग सानप, डाॅ. अशोक बांगर, डाॅ. प्रताप चौरे, डाॅ. संजय राऊत, डाॅ. राजेंद्र पवार, डाॅ. अर्चना झगडे, जामखेड रोटरी क्लबचे अध्यक्ष विनायक राऊत आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रयोगवनचे अध्यक्ष सत्तार शेख यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅक्टर्स असोसिएशनचे सचिव डाॅ. संजय राऊत यांनी केले. डाॅ. प्रताप गायकवाड यांनी आभार मानले.