Breaking News

आता जनताच परिवर्तन करणार : काळे

कोपरगाव ता. प्रतिनिधी - जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच कोपरगाव तालुक्यामध्ये ज्यांच्याकडे ४८ वर्षे सत्ता होती, आज त्यांच्या पक्षाचे देशात व राज्यात सरकार आहे. मात्र तरीही विकासकामांच्या बाबतीत या तालुक्याचे दुर्दैव आहे. त्यामुळे योग्य संधीची वाट पाहत असलेली या तालुक्याची जनता आता परिवर्तन करणार आहे, असे सुतोवाच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. 

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील देवनदीवर १४.३८ लाख रुपयांच्या बंधाऱ्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मानाना होन होते. पंचायत समिती कोपरगाव लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने जिल्हा परिषदेकडे तालुक्यातील चांदेकसारे, रवंदे, आपेगाव, संवत्सर आदी गावांसाठी बंधारे बांधण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. जिल्हा परिषदेने सर्व प्रस्ताव मान्य करून जवळपास ५७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. तालुक्याच्या जनतेने ज्या विश्वासाने लोकप्रतिनिधींना निवडून दिले, त्या लोकप्रतिनिधींनी जनतेचा पूर्ण भ्रमनिरास केला आहे.