अखेर बारागाव नांदूरची ‘ती’ अपहृत मुलगी मिळाली! सागर बर्डे यालाही झाली अटक
येथील अट्टल गुन्हेगार आणि वाळू तस्कराने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या वडिलादेखत झोपेत असतांना तिला चारचाकी वाहनातून उचलून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मुलीचे वडील विलास नामदेव पवार { रा. बारागाव नांदूर } यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारागाव नांदूर परिसरातून या गावातीलच अट्टल गुन्हेगार आणि वाळू तस्कर किशोर साहेबराव माळी आणि संजय भगवान बर्डे या दोघांसह अज्ञात एक अशा तीन जणांनी या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. या मुलीच्या वडिलांनी किशोर आणि संजय आणि एक अनोळखी अशा तिघांना चारचाकी काळ्या रंगाच्या गाडीत मुलीला टाकत असताना पाहिले. त्यांनी आरडओरड केली असता मुलीसह चारचाकी वाहनातून हे तिघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहे. यातील किशोर माळी हा अट्टल गुन्हेगार व वाळू तस्कर असून त्याच्याविरुद्ध राहुरी पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत त्याने अनेक अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचे बोलले जात आहे. माळी आणि त्याच्या साथीदाराने या अल्पवयीन मुलीला दोन दिववसांपूर्वी पळवून नेले होते. या मुलीच्या वडिलांनी किशोर माळीशी संपर्क करत ‘आमची मुलगी आम्हाला परत द्या’, अशी विनवनी केली. पण माळी याने ‘माझे काम झाल्यावर मुलीला पाठवून देईल. जर तू कोणाशी काही बोलला तर मुलगी दिसणार नाही, अशी धमकी त्याने दिल्याचे समजले आहे. सदर प्रकार नुकताच गाजलेला ‘रावडी राठोड’ या चित्रपटाला शोभेल असा दिसून येत आहे.
