Breaking News

आकाशवाणी भाजी बाजाराचा प्रश्‍न पेटला

भाजपा कारभार्यांच्या हेतूविषयी संशय

नाशिक, दि. 11, एप्रिल - गंगापूररोड़ वरील आकाशवाणी भाजी बाजाराच्या जागेवर एका खासगी विकासकाने रात्रीतून ताबा मिळवल्याने भाजी विक्रेत्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आकाशवाणी भाजी बाजाराचा प्रश्‍न पेटण्याची चिन्ह निर्माण झाले आहे.
आकाशवाणी जवळील आरक्षित भुखंड विकसित करण्यासाठी महापालिकेकडून  मंजुरी मिळवून खाजगी बिल्डरने थेट रात्रीतून जेसीबी मशीन लावत संपुर्ण जागा पोखरून काढत संपूर्ण जागाच ताब्यात घेतली मात्र भाजी विक्रेत्यांचा प्रश्‍नावर योग्य तोडगा न निघाल्याने भाजी विक्रेत्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे .
भाजी बाजाराचा पहिला प्लॅन 2011 ला मंजुर केला गेला .त्यानंतर अठरा मीटरच्या डीपी रोडमुळे महापालिकेच्या प्लॅनमध्ये नियमानुसार बदल करून 2016 मध्ये प्लॅन रिवाईज करण्यात आला त्यात मनपाला 40 टक्के व विकासकाला 60 टक्के प्रमाणे भाजी विक्रेत्यांसाठी 5 बाय 5 फुटाचे ओटे बांधून देण्यात येतील असा प्लॅन तयार करण्यात आला त्यात पार्कींगच्या सोयी विषयी काहीच प्रयोजन नसले तरी विकासकाला अतिरिक्त ढऊठ चा फायदा व्हावा यादृष्टीने प्लॅन सुधारित करण्यात आल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांनी केला आहे. त्यामुळे आमदार अपूर्व हिरे व स्थानिक नगरसेविका स्वाती भामरे यांनी भाजी विक्रेत्यांच्या आमरण उपोषणाला पाठींबा दिला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते किशोर शिरसाठ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे