Breaking News

आत्मबल वाढीसाठी शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन


जामखेड येथील सैन्य भरतीपुर्व प्रक्षिक्षण देणार्‍या शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीच्या वतीने प्रक्षिक्षण पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी येणार्‍या भरतीसाठी निरोप व शुभेच्छा कार्यक्रम तसेच सरावाच्या प्रात्यक्षिकचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

तालुक्यातील ग्रामीण भागातील देवदैठण या गावचे सुपुत्र कॅप्टन लक्ष्मण भोरे यांच्या कल्पनेतून जामखेड येथे भरतीपुर्व प्रक्षिक्षण केंद्र म्हणून शिवनेरी करिअर स्वप्नपूर्ती अकॅडमी या संस्थेची स्थापना केली. कॅप्टन लक्ष्मण भोरे यांचेबरोबरच खांद्याला खांदा देऊन काम करणारे त्यांचे सहकारी टेकाळे मेजर यांचाही विद्यार्थी घडविण्यात मोलाचा वाटा आहे. गेल्या काही वर्षांपासून शिवनेरी अकॅडमीच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रक्षिक्षण घेऊन आपल्या जिवनात प्रगती करत पोलीस, अथवा सैनिकी सेवेत यश संपादन केले आहे.

 कॅप्टन भोरे व टेकाळे मेजर यांच्या माध्यमातून कडक शिस्त लावून सर्वगुणसंपन्न व परिपूर्ण प्रक्षिक्षण देऊन विद्यार्थी घडविले जातात. त्यामुळे अल्पावधीतच शिवनेरी अकॅडमी ही संस्था जनसामान्यांच्या मनात उतरली असून सर्व स्तरांतून अकॅडमीचे संचालक भोरे व टेकाळे यांचे कौतुक होत आहे. याच पार्श्‍वभूमीवर चालू शैक्षणिक वर्षांत पोलीस व सैनिकी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भरतीस सामोरे जात असताना त्यांचा सराव, गुणवत्ता यांची खात्री करणे, अथवा त्यांना सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शुभेच्छा देऊन पुढे जात असताना त्यांचे ध्येय, प्रेरणा व आत्मबळ वाढीस लावण्यासाठी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी येथे सराव प्रात्यक्षिक व शुभेच्छा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात हे होते. यावेळी नगरसेवक डिगांबर चव्हान, डॉ. प्रदिप कुडके, डॉ. घोडके, मेजर टेकाळेसह आदी डॉक्टर, विद्यार्थी व अकॅडमी परिवार उपस्थित होते. यावेळी उपस्थितीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.