यशवंत सिन्हा यांचा भाजपला रामराम देशात लोकशाही धोक्यात आली असल्याचे सिन्हा यांचे मत
दिल्ली : माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ यशवंत सिन्हा यांनी शनिवारी भाजपला रामराम ठोकला. यापुढे पक्षाशी संबंध ठेवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रमंचातर्फे पाटणा इथे असलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘मी भाजप सोडतोय. देशात लोकशाही धोक्यात आली आहे. अर्थसंकल्प अधिवेशन ठप्प होणे हे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे.’
यावेळी बोलतांना सिन्हा म्हणाले की, ‘संसद चालावी म्हणून पंतप्रधान विरोधी पक्षांशी का बोलले नाहीत.? देशात रोकड कमी झाली याला जेटली आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जबाबदार आहेत. भाजपाशी असलेले सर्व संबंध संपल्याचं त्यांनी सांगत, सिन्हा यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
मोदी सरकारला संसदेचं अधिवेशन चालू द्यायचं नव्हतं, असा स्पष्ट आरोप यशवंत सिन्हा यांनी केला. ’संसद चालवण्याची जबाबदारी सरकारची असते. मात्र मोदी सरकारला याबद्दल कोणतीही चिंता नव्हती. उलट संसदेचं कामकाज चालत नसल्यानं सरकारला आनंदच झाला. कारण विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव आणला जाणार होता. हा प्रस्ताव आणण्यासाठी 50 खासदारांचं समर्थन आवश्यक असतं. मात्र प्रस्तावाला किती जणांचं समर्थन आहे, हे मी मोजू शकत नाही, असं म्हणून लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना प्रस्ताव आणू दिला नाही. मोदी सरकारनं अशाप्रकारे लोकशाहीची थट्टा चालवली आहे,’ अशा शब्दांमध्ये सिन्हा यांनी मोदी सरकारवर तोफ डागली.
माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिन्हा यांनी भाजपविरोधात आघाडी उघडली होती. सर्व प्रकारच्या पक्षीय राजकारणापासून संन्यास घेत असल्याची घोषणा सिन्हा यांनी यावेळी केली.पाटण्यात ’राष्ट्र मंच’ची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा, तेजस्वी यादव, शरद यादव यांच्यासह जेडीयूमधील अल्पसंतुष्ट नेते सहभागी झाले होते. या बैठकीत भाजपविरोधी रणनीती आखण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर व्यापक आघाडी उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
यशवंत सिन्हा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. सिन्हा यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा देवून राजकारणात प्रवेश केला होता. 1998,1999 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकींमध्ये त्यांनी झारखंड राज्यातील हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री म्हणून काम बघितले. 2009 मध्ये पंधराव्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाला जबाबदार ठरवत पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला होता.
भाजपला धक्का, विरोधकांना बळ
आगामी कर्नाटक तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने यशवंत सिन्हांनी घेतलेला निर्णय भाजपला अडचणीत आणणारा ठरू शकतो. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सत्ताकाळात सिन्हा यांनी अर्थमंत्री पदाचा कारभार सांभाळला होता. तत्कालीन पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील सिन्हा महत्वाचे नेते होते. सिन्हा यांनी वारंवार भाजपला लक्ष्य केले होते. तसेच पक्षावर नाराज असलेले सिन्हा कॉग्रेससोबत जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता.