झोपडपट्टीला लागलेल्या आगीत 10 घरे जळून खाक
पुणे : मार्केट यार्डच्या मागे असलेल्या आंबेडकर नगर झोपडपट्टीला शनिवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या आणि 3 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.
या भागात मोठी नागरी वस्ती असल्याने 4 रुग्णवाहिका आणि 2 जेसीबी देखील दाखल करण्यात आल्या होत्या. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे वृत्त आहे. या झोपडपट्टीत दाटीवाटीने घरे, दुकाने असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरत होती. सुरुवातील 8 ते 10 खासगी पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाच्या मुख्य अग्निशमन अधिकार्यांसह इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. अग्निशमन दलाच्या 60 ते 70 जवानांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत 8 ते 10 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिलेंडर फुटल्यामुळे ही आग लागल्याची चर्चा स्थानिकांमध्ये असली तरी आगीचे नेमके कारण अद्याप कळु शकले नाही.