Breaking News

खेड बसस्थानकाजवळचे वळण बनले जीवघेणे


कर्जत तालुक्यातील खेड येथील बसस्थानकासमोरचे वळण जीवघेणे बनले आहे. बसस्थानकासमोर एल आकाराचे वळण असुन उताराचा रस्ता असल्याने वेगाने येणारी वाहने अपघातग्रस्त होण्याचा धोका आहे. या वळणावर भिगवणच्या बाजुला गतीरोधक बसविण्याची मागणी युवा नेते अमोल जावळे यांनी केली आहे.

खेड बसस्थानक परिसरात नागरिकांची सतत वर्दळ असते. रस्त्यालगत अनेक दुकाने असल्याने याठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या रस्त्यालगतच परिवर्तन इंटरनॅशनल स्कूल, लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय व राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय असल्याने येथून शालेय विद्यार्थ्यांची नियमित ये-जा सुरु असते. त्यामुळे या मार्गावर तात्काळ गतीरोधक बसविण्यात यावे, तसेच डांबरीकरण काम करावे अशी मागणी अमोल जावळे यांनी यावेळी केली आहे.

महाविद्यालय रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत अशी मागणी तुषार मोरे, केतन मोरे, दिनेश दळवी, कृष्णा मोरे, अक्षय रणवरे, निलेश मोरे, स्वप्नील शिंदे, राहुल शेटे, निखिल साळुंखे, मस्जिदअली शेख, नवनाथ वाघमारे आदींनी केली आहे.