Breaking News

राष्ट्रकुल स्पर्धेत मेरी कॉमनं पटकावलं सुवर्णपदक

मेरी कोमने कॉमनवेल्थ गेममध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. 45-48 किलो वजनी गटात झालेल्या बॉक्सिंगमध्ये तिने हे पदक मिळवले आहे. मेरी कोमने कॉमनवेल्थ गेममध्ये पहिल्यांदाच भाग घेतला आहे. तिच्या या सुवर्णकमाईमुळे भारताच्या तिजोरीत आतापर्यंत 18 सुवर्णपदकांची संख्या झाली आहे.अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर 5-0ने मात करत मेरी कोमने सुवर्णपदक आपल्या नावे केलं. विशेष म्हणजे राष्ट्रकुलमधलं मेरी कोमचं हे पहिलं पदक आहे.