राहुरीत शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन
राहुरी (प्रतिनिधी) - भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकराच्या जयंती निमित्त राहुरी पोलिस स्टेशनच्या आवारात शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या वेळी शहरातील नागरीक,पत्रकार,समाजसेवक, या वेळी मार्गदर्शन करतात पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ म्हणाले कि जयंती उत्सव हा शांततेच्या मार्गाने पार पाडवा व प्रशासनास मदत करावी तसेच मंडळाच्या वतिने सूचना करण्यात आल्या कि शहरातील शुक्लेवर चोक व पृथ्वी कॉर्नर या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त व सीसी टीवी कमेरे बसवावेत या मागणीला पोलिस प्रशासनाने हिरवा कंदील दिला व जयंती शांततेत पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त केली.या वेळी आर.पी.आय.चे पापाभाई बिवाल,शहरध्यक्ष विलास साळवे,राहुल शेटे,देवेंद्र लांबे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष बॉबी साळवे,किरण साळवे,अजिंक्य शिदे,अनुप साळवे,राजु आढाव,सुभाष साळवे,प्रतिक रूपत्तके,सनी साळवे,बाबासाहेब शेलार,शैलेश भारस्कर,भुषण साळवे इ सह नागरिक व जयंती उत्सव समिती पदाधिका-यानी उपस्थिती होती. या वेळी सर्वानीच जयंती शांततेत पार पाडली जाईल अशी ग्वाही दिली तर आभार पोलीस हवालदार नारायण ढाकणे यांनी मानले.