Breaking News

शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने पाणपोइ

सोनई : माजी आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने सोनई एस टी स्टॅण्ड परिसरात पाणपोई सुरु करण्यात अली त्याचे उदघाटन जुन्या काळात सोनईला कावडीने पाणी पुरविनारे धनगर समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते कुंडलिकराव आदमने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी माजी आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पाणपोई सारख्या उपक्रमास लोकांनी पाठबळ द्यावे असे आवाहन गडाख मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले. धनगर समाजाचे कुंडलिक आदमने आपल्या उमेदीच्या काळात सोनई गावाला कावडीने पाणी पुरवठा करत होते. त्यांच्या हस्ते आज या पाणपोईचे उदघाटन करून मित्रमंडळाने नवीन उपक्रम चालू केला. सध्या उन्हाळ्याचे चटके जाणवू लागले आहे. त्यामुळे चौकाचौकात पाणपोई सुरु करण्याची गरज आहे यावेळी शंकर दरंदले, दत्त दिगंबर पाणी वापर संस्थेचे चेअरमन सुभाष निमसे, भास्कर येळवंडे, शरद बेल्हेकर, पोपट शेटे, शिवा चपळे, संतोष चपळे,अशोक भुसारी, सोन्याबापू बेल्हेकर, सुरेश शिंदे, बाळासाहेब वीरकर, शरद दरंदले, बापू गवळी, गणेश दरंदले आदी उपस्थित होते.