दखल - मोदी तुम्ही इशारे द्या; आम्ही बोलत राहू
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आतापर्यंत का कमी वेळा वाचाळवीरांना इशारे दिले. परंतु, एका कानानं ऐकायचं आणि दुसर्या कानानं सोडून द्यायचं, असं भाजपच्या नेत्यांचं चालू आहे. यातून तीन अर्थ निघतात. पहिला अर्थ मोदी व शहा यांचा नेत्यांवर वचक नाही. दुसरा अर्थ मोदी-शहा काय म्हणतात, याकडं नेत्यांचं लक्ष नाही. तिसरा अर्थ कोणत्याही गोष्टीवर तुम्ही व्यक्त होत राहा, त्याची प्रतिक्रिया आम्ही अजमावू. तुम्हाला काही खडे बोलही सुनावू. परंतु, तुम्ही ते काहीही मनावर न घेता आपलं अधूनमधूनचं बरळणं सुरूच ठेवायचं. त्यामुळं समाजात संभ्रम, गोंधळ राहील, याची व्यवस्था आपोआप होईल.
तिसरा अर्थ जो आहे, तोच जास्त अभिप्रेत असला पाहिजे. त्याचं कारण भाजपत मोदी व शहा यांना वगळून एकही पान हलत नसताना, त्यांच्या इशार्यानंतरही वादग्रस्त वक्तव्यं करण्याची हिमंत कशी होईल? आताही कथुआ व देशभरातील बलात्काराच्या अन्य घटनांवरून भाजपला लक्ष्य केलं जात आहे. त्याला कारणही तसंच आहे. कथुआ येथील बलात्काराप्रक रण अटक करण्यात आलेल्यांचं समर्थन करण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला. उन्नाव येथील बलात्कारात तर भाजपचाच आमदार आरोपी आहे. उत्तर प्रदेशातील एका बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या विरोधातील गुन्हा मागं घेण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ सरकारनं घेतला. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी भाजपवाल्यांपासून मुलींना वाचवा, असं म्हटलं असलं, तरी त्यात त्यांना दोष देता येणार नाही. त्याअगोदर एक महिला आणि त्यातही खासदार असलेल्या हेमा मालिनी यांनी बलात्काराच्या घटनांचा निषेध करताना त्या अतिरंजित असतात, असं वक्तव्य केलं होतं, तर संतोष गंगवार यांनी एवढ्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना घडत असतात, असं सांगून वादात पेट्रोल ओतलं.
या पार्श्वभूमीवर आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुमच्या वादग्रस्त विधानांमुळं पक्षाला त्रास होतोय. विनाकारण माध्यमांना बातम्यांसाठी मसाला देऊ नका, अशा शब्दांत मोदी यांनी भाजपच्या आमदार आणि खासदारांना खडसावलं. मोदींनी रविवारी नमो अॅपवरुन पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी या सूचना केल्या आहेत. पत्रकारांसमोर कोणत्याही प्रकारे वादग्रस्त प्रतिक्रिया देऊ नका. आपण चुका करतो आणि माध्यमांना मसाला देतो. आपल्याला समोर कॅमेरा दिसला, की लगेच प्रतिक्रिया द्यायला लागतो. जसं की आपण कोणी मोठी महान आणि तज्ज्ञ व्यक्ती आहोत. याच नकळत दिलेल्या प्रतिक्रियांचा माध्यमं वापर करुन घेतात. यात माध्यमांची चूक नसून तुमचीच चूक आहे, असं मोदी यांनी खडसावलं होतं. मोदींच्या मतानुसार, कॅमेरा समोर दिसताच पक्षाच्या नेत्यांनी घटनांचं विश्लेषण करण्यापासून दूर राहावं. स्वतःवर संयम ठेवावा. जबाबदार व्यक्तीनंच अशा विषयांवर भाष्य करावं. जर सर्वच जण त्या विषयावर बोलायला लागले, तर मुद्द्यांमध्ये बदल होत राहील. अशा वेळी थेट देश, पक्ष आणि त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत प्रतिमेचं नुकसान होईल. मोदी यांची सूचना अतिशय योग्य होती. क थुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणानंतर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्र्यांनी बेताल वक्तव्यं केली होती. त्यामुळं यांना हस्तक्षेप करावा लागला. भाजपला जनतेकडून मिळणारा पाठिंबा वाढत असल्यानं पक्षाची जबाबदारीही वाढत आहे. अशावेळी जाहीरपणे मतप्रदर्शन करताना भान ठेवण्याची गरज आहे. बेजबाबदर वक्तव्यं करणं योग्य नव्हे, अशा शब्दांत मोदींनी भाजप नेत्यांना समज दिली आहे.
मोदी यांनी समज देऊन 24 तास होत नाहीत, तोच साध्वी प्रज्ञा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मत देणारे रामजादे आणि भाजपला मत न देणारे हरामजादे अशी उघड उघड विभागणी करणार्या याच त्या साध्वी प्रज्ञा. कथुआ प्रकरणाचं आरोपपत्र न्यायालयात दाखल झालं आहे. आठ वर्षाच्या मुलीवर कसा बलात्कार झाला, याची कबुली आरोपींनी दिली आहे. बलात्कार प्रकरणानंतर निर्माण झालेल्या देशव्यापी नाराजीची दखल घेऊन मोदी सरकारनं शिक्षा कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. असं असताना साध्वी प्रज्ञा यांनी साध्वीपणाशी हरकत घेणारं वक्तव्य केलं. जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षाच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या करण्यात आल्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना साध्वी प्रज्ञा यांनी मात्र वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. कठुआ बलात्कार झालाच नाही, हे तर राजकीय षडयंत्र आहे असं वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केलं आहे. कठुआ बलात्कार एक असं षडयंत्र आहे, जे ऐकून मनात एका विशेष जातीवर्गासाठी घृणा निर्माण होते. हा वर्ग आहे मुस्लीम, काँग्रेस आणि डावे आहेत. त्या मुलीबोसबत बलात्कार झालाच नाहीये हे मेडिकल आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय. फक्त तिची हत्या झाली आहे. तीपण कोणी केली माहिती नाही. पण, बलात्कारासारखा आरोप करत एक ा हिंदूला अडकवलं जातं. यापेक्षा बीभत्स राजकीय षडयंत्र असूच शकत नाही’, असं त्यांनी म्हटलं आहे. मुलीवर बलात्कार झालाच नाही. मुलीची हत्या कोणी केली याकडं कोणाचं लक्षच गेलं नाही. ज्या मुलीवर बलात्कार झाला नाही, तिच्यावर बलात्कार झालाय म्हणून आरडाओरड करण्यात आली. काँग्रेसनं, डाव्यांनी, मुस्लिमांनी मृत्यूनंतर तिचा बलात्कार केला. मृत्यूनंतरही तिच्या आत्म्याला शांतता मिळाली नाही’, असंही त्या म्हणल्या.
दुसरीकडं भाजपचे खासदार लक्ष्मीनारायण यादव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात यादव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पाणी प्रश्नावरून यादव यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते अचानक चिडले आणि पाण्याची समस्या तर माझा बापही सोडवू शकत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं. वाचाळ नेत्यांमुळे भाजपसमोरील अडचणीत सातत्यानं वाढ होताना दिसते आहे. मध्य प्रदेशमधील बुंदेलखंड परिसरात अनेक दशकांपासून पाण्याची गंभीर समस्या आहे. विशेषत: उन्हाळ्यात येथील लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. बुंदेलखंडमधील दुर्गम परिसरात राहणार्या लोकांना आजही पाण्यासाठी कोसो दूर जावं लागतं. अनेकवेळा याबाबत माध्यमांमध्ये वृत्त आलं आहे. त्यामुळं खासदार यादव यांना बुंदेलखंडमधील जलसंकटाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या समस्येसाठी काय घरोघरी पाण्याचे ग्लास घेऊन जाऊ का, असा उलट त्यांनी सवाल केला. माझ्या मतदारसंघात 825 पंचायती आहेत. अशात माझे वडीलही ही समस्या सोडवू शकत नाहीत, असं ते तावातावानं म्हणाले. यादव हे सागर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर गेले आहेत. नल-जल योजनेचं काम सुरू आहे. जनता 4-5 महिने वाट पाहू शकत नाही का, असा सवाल त्यांनी केला. यादव हे सागर जिल्ह्यातील जासी नगर येथे उज्वला योजनेतंर्गत गॅस सिलिंडरच्या वितरण कार्यक्रमासाठी आले होते. याच कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी आपल्या खासदार आणि आमदारांशी संवाद साधताना वादग्रस्त वक्त व्यापासून दूर राहा, असा सल्ला दिला होता.