संजय गातेंचा कुटील डाव...
बहुजन समाजातील विविध जात पंथांना परस्परांशी झुंजवून सत्ताकारण करणारी नतद्रष्ट जमात राजकारणाला परकी नाही. त्याहीपलीकडे जाऊन एकाच जातसमुहात असलेल्या मतभिन्नतेचा फायदा उपटून त्या समाजात फुट पाडण्याचे नवे तंत्र भारतीय जनता पक्षाने विकसित केले आहे. मुंबईच्या इंदू मिलमध्ये असलेले गोरोबा काकांचे मंदीर आणि तेथील 25 हजार चौरस फूट जागा कुंभार समाजाच्या हवाली करण्याची मागणी संजय गाते या कुंभार समाजाच्या व्यक्तीने करणे हा निव्वळ योगायोग नाही तर या मागणीला भारतीय जनता पक्षाची कुटील नितीची पार्श्वभूमी आहे. या मागणीचा बोलविता धनी कोण? या प्रश्नाच्या उत्तरातच मागणीचा हेतू दडला आहे. महाराष्ट्रात पुरोगामी विचारसरणीचा वारसा सांगणार्या राजकारणाची सद्दी संपली की काय अशी शंका यावी असे वातावरण गेल्या चार पाच वर्षाच्या कालखंडात विकसीत झाले किंबहूना मुद्दामहून विकसीत केले गेले आहे. धर्म पंथ जातीच्या नावावर राजकारण होणे ही नवी बाब नाही.
अलिकडच्या काळात वेगवेगळ्या जात धर्मातच नव्हे एकाच जातीत असलेल्या किरकोळ मतभेदांना फुलवून मनभेद करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्याचे उत्तरदायीत्व सर्वस्वी भारतीय जनता पक्षात वावरणार्या काही विषवल्लीकडे जाते. या दाव्याला दुजोरा देणार्या अनेक घटना आहेत. त्यापैकीच संजय गाते या भाजपचा पुर्णवेळ कार्यकर्ता असलेल्या कुंभार समाजाच्या कथित नेत्याने केलेली मागणी.
संजय गाते हे मुळचे विदर्भातील वर्धाचे. त्यांच्या धर्मपत्नी शितल गाते या भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेल्या वर्धाच्या नगराध्यक्षा आहेत. याचाच अर्थ त्यांच्या घरात भाजपाचे राजकारण मुरले आहे. असा माणूस जेंव्हा समाजाला वेठीस धरणारी एखादी मागणी करतो तेव्हा त्यामागची पार्श्वभूमी तपासणे ही समाज हितासाठी काळाची गरज बनते. संजय गाते यांनी केलेली मागणी केवळ कुंभार समाजात फूट पाडणारी नाही तर डॉ. आंबेडकर विचारांचा पाईक असलेला बहुजन समाज आणि कुंभार समाजात मनभेदाचे विष पेरून दोन्ही समाजात वैमनस्याचे बीज रूजविण्यास निमित्त ठरणारी आहे. संजय गाते यांची ही मागणी अखिल कुंभार समाजाची आहे असे मानणे सर्वात मोठी घोडचुक आहे. मुळात संजय गाते यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने ज्या महाराष्ट्र कुंभार महासंघाच्या नावावर मागणीची ठिणगी पेटविण्याचा कुटील प्रयत्न केला तो महासंघ यांच्या मालकीची जहागीरी नाही. किंबहूना अनाधिकृतपणे महाराष्ट्र कुंभार महासंघावर कब्जा मिळवून नागोबा बनण्याचा त्यांचा प्रयत्न यापुर्वी अनेकदा समाजाने धुडकावून लावला आहे. ही वास्तुस्थिती नाकारून संजय गाते आणि चमू आपल्या राजकीय बापजाद्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारची वादग्रस्त मागणी करून समाजाला वेठीस धरण्याचा प्रमाद करीत आहेत. ही मागणी करण्यापुर्वी संजय गाते यांनी वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी होती.
मुंबई दादर येथील इंदु मिलची जमीन ही भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. भिमरावजी आंबेडकर साहेब यांच्या समारकासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. त्या जागेची मागणी करण्याचा मुर्खपणा सच्चा राष्ट्रवादी विचारांचा कुंभाराचा माणूस कधीच करणार नाही. ही मागणी करणे म्हणजे महामानव घटनाकारांच्या विचारांशी केलेला द्रोह आहे, ही आवास्तव मागणी करून महाराष्ट्र राज्यातील कुंभार समाज टिकेचा धनी होऊ इच्छीत नाही. समाजाला त्याचे दुरगामी परिणाम भोगावे लागतील असा विचार करणारा समाजाचा कुठलाही नेता या मागणीचे समर्थन करणार नाही. कुंभार समाजाच्या विकासासाठी डॉ. भिमरावजी आंबेडकर यांचे योगदान मोठे आहे. ते योगदान विसरण्या इतका कुंभार समाज कृतघ्न नक्कीच नाही. हा विचार मागणी करण्यापुर्वी संजय गाते यांनी करायाला हवा होता. अर्थात ज्यांना समाजाच्या हिताशी कधी सोयरेसुतक नव्हते त्या संजय गाते यांच्याकडून ही अपेक्षा ठेवणे गैर आहे. त्यांना हवा तो उद्देश या मागणीतून साध्य होतोय. संजय गाते हे केवळ एक बाहुले आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे एव्हाना समाजाच्या लक्षात आले आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला स्मारकांचे राजकारण करायाचे आहे. स्मारक छत्रपतींचे असो नाहीतर घटनाकारांचे, महापुरूषांवर नितांत श्रध्दा असलेल्या बहुजनांना स्मारकाच्या राजकारणात झुंजवायची या मंडळींची रणनिती आहे. संजय गाते यांची ही मागणी या रणनितीचा एक भाग आहे. सत्ताधार्यांना विशेषतः भाजपाला इंदू मिलचे स्मारक सहजासहजी पुर्ण होऊ द्यायचे नाही म्हणून कुंभार समाजाच्या खांद्यावर या मागणीचे ओझे लादण्याची जबाबदारी संजय गाते यांच्यावर सोपवण्यात आली आहे. हा नवा वाद उकरून स्मारकाच्या कामात अडथळा निर्माण करायचा आणि हे स्मारक झाले नाही किंवा विलंब झाला तर त्याचे खापर कुंभार समाजावर फोडायचे. आंबेडकरी समाज आणि कुंभार समाजात भानगडी लावायच्या आणि त्या वातावरणात राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा हा डाव आहे. दुर्दैवाने संजय गाते यांच्या या मागणीने उचल खाल्ली तर अल्पसंख्य कुंभार समाज एकाकी पडेल. समाजावर मार खाण्याची वेळ येईल तेव्हा संजय गाते आणि त्यांचे बगलबच्चे भूमीगत असतील. हा धोका समाजाच्या ध्यानात आला आहे. म्हणूनच संजय गाते आणि त्यांच्या बोलविता धन्याचा जाहीर निषेध करण्याची समाजाची मानसिकता बनली आहे. संजय गाते यांना समाजाच्या मालकीच्या जागेची एव्हढीच तळमळ आहे तर आळंदी येथील समाजाची दोन एकर जमीन आपल्याच समाज बांधवांनी करोडो रूपयांना विकली तेव्हा का शेपूट घातले असा सवाल समाज आज विचारत आहे. यातून संजय गाते आणि मंडळींची मानसिकता समाजद्रोही आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अशोक सोनवणे