Breaking News

स्वाभिमानी युथ रिपब्लिकनमार्फत सत्कार


स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्ष यांच्या विद्यमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्ताने सहभागी झालेल्या पोलिस प्रशासन, नगरपालिका, पत्रकार बांधव यांचा सत्कार समारंभ समता हॉल येथे आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोकनियुक्त नगराध्यक्ष विजय वहाडणे उपस्थित होते. पोलिस निरीक्षक सिध्दार्थ आहिरे, नगरसेवक हाजी मेहमुद सय्यद, शैलेष शिदे, तसेच ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब जवरे, अ‍ॅड. नितिन पोळ, विजय त्रिभुवन, बुध्दिष्ठ यंग फॉर्स, शरद त्रिभुवन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र जगताप यांनी तर सूत्रसंचालन नानासाहेब मोरे यांनी केले. यावेळी पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजक शहराध्यक्ष नितिन शिदे, उपाध्यक्ष गणेश पवार, कार्याध्यक्ष रविंद्र जगताप, सहसंघटक राजेंद्र घोडेराव, संघटक तौफिक शेख, सह कार्याध्यक्ष विषाल कोपरे, खजिनदार योगेश शिदे, भाऊसाहेब भालेराव, सरदार शेख, अरविंद आंभोरे, अबुबकर मनियार, संतोष शिदे, तुषार दुशिंग, आकाश शेजवळ, अनिल खंडीझोड, विशाल बागडे, शामराव मोकळ आदी मान्यवर उपस्थित होते. नितिन शिदे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

त्याचबरोबर यावेळी रमाबाई प्रतिष्ठानच्या रूपाली त्रिभुवन यांची महिला शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. ताराबाई गरूड यांची उपाध्यक्षा, रेखा चाबुकस्वार यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. योगेष शिदे यांची युवा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.