Breaking News

संरक्षण मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ हॅक

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ शुक्रवारी हॅक झाले असून त्यावर चायनिज भाषेतील अक्षरे दिसत आहेत. त्यामुळे देशाच्या सायबर सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्‍न चिन्ह उपस्थित होत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर त्यावर एरर असा संदेश दिसतो. तसेच वापरकर्त्याला पुन्हा प्रयत्न करण्यास सांगितले जाते. संके तस्थळाच्या मुख्य पानावर चायनिज भाषेतील संदेश दिसत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, संकेतस्थळावरील नियंत्रण लवकरच मिळवले जाईल. याबाबत कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच भविष्यत असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना के ल्या जातील. या घटनेबाबत ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून संरक्षण मंत्रालयाच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाला मोठ्या नामुश्कीला सामोरे जावे लागत आहे. या प्रतिक्रियांमध्ये संकेतस्थळावरील चायनिज भाषेतील अक्षरांचा अर्थ गुगल ट्रान्स्लेट ’लवकर नाही’ असे दाखवत असल्याचेही सांगण्यात आले आहे. अन्य एका ट्विटर वापरकर्त्याने या प्रकाराला माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा अपुरेपणा असल्याचे म्हणत हे मंत्रालय तंत्रज्ञानाच्या गतीशी मेळ खात नसल्याचे सांगितले. त्यामुळे स्वतंत्र सायबर सुरक्षा मंत्रालयाची निर्मिती करण्याची वेळ आल्याचे मत या वापरकर्त्याने व्यक्त केले.