Breaking News

वळण भागात आढळला मृत बिबट्या


राहुरी तालुक्यातील वळण शिवारात बुधवारी दुपारच्या दरम्यान येथील पडीक क्षेत्रात एक नर जातीचा मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. त्यामुळे या परिसरात घबराट पसरली आहे. या भागात आणखी किती बिबट्यांचा संचार आहे, अशी भितीदायक आणि प्रश्नात्मक चर्चा येथे सुरु आहे. 
येथील शेतकरी हरीभाऊ आढाव यांच्या मुळा नदीजवळील काही शेतकरी शेतात कामानिमित्त गेले असता एक बिबट्या निद्रस्त अवस्थेत दिसला. येथील शेतकर्यांनी तात्काळ या घटनेची माहिती सरपंच बी. आर. खुळे, पोलीस पाटील सोमनाथ डमाळे, ज्ञानेश्वर खुळे यांना दिली. त्यांनी सदर घटनेची खबर राहुरी वन विभाला दिली. त्यानंतर वनविभागाचे वनक्षेत्रपाल यु. बी. वाघ, वनपाल जी. एन. लोढे यांच्या मार्गदर्शनाखाली एल. डी. किनकर, यु.पी.खराडे सह कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मृत बिबट्या त्यांनी ताब्यात घेतला. पशुवदैकीय अधिकारी दरंदले यांनी शवविच्छेदन केले. या बिबट्याने शिकार केल्यावर त्याला पाणी न मिळाल्याने तसेच उष्णतेचा तीव्र झटका बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.