नेवासा ( शहर प्रतिनिधी )- सत्तेत आल्यापासून प्रत्येक वर्षी भर उन्हाळ्यात कृती समिती व लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्यामुळे तसेच मंत्री महोदयांच्या सहकार्याने सर्व बंधारे भरले जात आहेत. हे बंधारे भरण्यासाठी पाणी पट्टीचे योग्य नियोजन आपण केल्यामुळे सर्व लाभार्थी शेतकर्यांचे आभार मानले पाहिजेत असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. नेवासा तालुक्यातील मुळा व प्रवरा नदीवरील सर्व बंधारे भरत आले आहेत. आज नेवासा येथील मध्यमेश्वर बंधार्यात पाणी आल्यानंतर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते जलपुजन करून व नगराध्यक्षा संगीता बर्डे यांच्याहस्ते प्रवरा माईची ओटी भरण्यात आली. मध्यमेश्वरचे देवस्थानचे आकाशनाथ महाराज आणि बंधारा कृती समितीच्या शेतकर्यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.नेवासा बुद्रुक, खुपटी, चिंचबन, पाचेगाव, साईनाथनगर, बहिरवाडी, निंभारी या गावातील शेतकरी तसेच प्रत्येक बंधार्याच्या कृती समितीचे सदस्य हजर होते. यामध्ये शहरातील सर्व नगरसेवकनेवासा बुद्रुकचे सरपंच दादासाहेब कोकणे, खुपटीचे सोपान ससे, नेवासा बुद्रुकचे संभाजी पवार, बहिरवाडीचे नंदकुमार वाखुरे, संभाजी ठाणगे, बाबा कांगुणे, दत्तात्रय वरुडे, आशाताई राजगिरे आदी मान्यवर हजर होते. यावेळी नगरसेवक रणजित सोनवणे, दिनेश व्यवहारे, गटनेते सचिन नागपुरे, दत्तात्रय बर्डे, भारत डोकडे, सुनील वाघ, राजेंद्र मुत्था, फैजान शेख, सतीश गायके, आप्पासाहेब गायकवाड, सखाराम डोहळे, नानासाहेब शेंडे, राजेंद्र मारकळी, दिलीप नळघे, अमृत फिरोदिया, विष्णू उदागे, अनिल बोरकर, प्रकाश गुजराथी आदी उपस्थित होते.
मध्यमेश्वर बंधार्याचे आमदार मुरकुटे यांच्या हस्ते जलपुजन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:45
Rating: 5