Breaking News

शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा शहरात 50 मिनीटे सुरू होता पाऊस

कर्जत तालुक्यातील शहरासह राशीन, खेड, वडगांव तनपुरा, रेहकुरी, बर्गेवाडी, पाटेवाडी, माहीजळगाव, तरडगाव यासह तालुक्यातील बहुतांश गावाना पावसाचा फटका काल सायंकाळी बसला. कर्जत शहरात 
जवळपास 50 मिनीटे पाऊस सुरू होता.


शहर व परीसरात विजेचा कडकडाटासह वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे. कर्जत परीसरात गारांचा पाऊस पडल्याने शेतकर्‍यांचा कांदा, हरभरा, गहु, कलीगंड व विशेष महत्वाचे व फळाचा राजा आंबा याचे आतोनात नुकसान झाले.
द्राक्षे, डाळीब, चिकु या पिकांचेही नुकसान होणार आहे.
वादळी वार्‍याबरोबर विजेचा प्रचंड गडगडाट, गारांसह पाऊस झाल्याने शेतकरी चिंताग्रत झाला. शेतकरी वर्गाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करावेत अशी मागणी डॉ. विलास राऊत यांनी केली आहे.
या पावसाने रस्त्यावरून मोठया प्रमाणात पाणी होते. काही वेळासाठी पावसाळयासारखी स्थिती पहावयास मिळाली.