Breaking News

चीनच स्पेस मुंबईवर कोसळण्याची भीती

मुंबई : चीनच भरकटलेल स्पेस सोमवार पर्यंत कधीही मुंबईवर कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या स्टेशनच्या मार्गात महाराष्ट्रासह मुंबईचा बराचसा भाग येणार आहे.टीयाँगाँग असे या चिनी स्पेस स्टेशनचे नाव आहे. स्पेस साधारण एका स्कूल बसएवढे आहे. खाली कोसळताना त्याचे लहान तुकडे होण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. या तुकडयांमध्ये विषारी वायू असण्याची शक्मयता असल्याने कोणीही त्याला हात लावू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. स्पेस स्टेशनच्या संभाव्य मार्गात मुंबईसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर अशा पट्टयाचा समावेश आहे. स्पेस स्टेशनचा वेग पाहता, ते नेमके कुठे पडेल, याचा अंदाज बांधण्ीढ कठीण आहे. सोमवारी पहाटे चार वाजून 55 मिनिटांनी प्रयोगशाळेने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यावर परिसराबाबत अंदाज मांडता येईल. त्याचप्रमाणे या स्पेसचे तुकडे 200 ते 300 किलोमीटर परिसरात पसरण्याची चिन्हे आहेत. 2011 मध्ये टीयाँगाँग हे स्पेस स्टेशन लाँच करण्यात आले होते. दोन वर्षांसाठी या प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली होती, मात्र 2016 मध्ये स्पेस स्टेशनशी चीनचा संपर्क तुटला. तेव्हापासून ही प्रयोगशाळा अंतराळात कुठल्याही नियंत्रणाशिवाय फिरत आहे. खरे तर, हे स्पेस स्टेशन समुद्रात पाडले जाणार होते, मात्र त्याआधीच त्याच्यासोबत संपर्क तुटला. बहुतेक वेळा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यावर अशा वस्तू जळून खाक होतात.