Breaking News

पारी चित्रपटात पारूच्या भूमिकेत झळकणार महीमा


भाविनिमगाव प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यातील बक्तरपूर येथील बाल कलाकार महीमा शाम ससाणे ’ पारी’ या मराठी चित्रपटात झळकणार असुन परिसरातुन प्रथमच एखादा कलाकार मराठी चित्रपटात दिसणार असल्याने तिच्या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे. 


सैराट या मराठी चित्रपटाने यशाचे नवे शिखर गाठले त्यात ग्रामीण कलाकारांनी आपल्या भुमिकेने प्रेक्षकांना चित्रपट गृहात खिळून ठेवले. यावरून चित्रपट निर्माते ग्रामीण भागातील कलाकारांची भुमिका असलेल्या चित्रपटाची निर्मिती करुन खेडेगावातील कलाकारांना संधी देऊन सरस मराठी चित्रपट निर्मिती करतात. अशाच एका ग्रामीण विषयाला हात घालत शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील प्रसिध्द चित्रपट निर्माते/ दिग्दर्शक मारुती सापते यांनी ग्रामीण रूपरेखा असलेल्या ’ पारी’ या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. मोहन जोशी, नागेश भोसले, विजय गोखले, रवी पटवर्धन, प्रकाश धोत्रे, सुरेखा कुडची, राजश्री गर्जे, अश्‍विनी सरपुरे, यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात शेवगाव तालुक्यातील बक्तरपूर येथील महीमा शाम ससाणे हीची बालकलाकाराची भुमिका करत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलीची निवड एका चित्रपटात झाल्याने परीसरात महीमाचे कौतुक केले जाते आहे. सापते फिल्मस् निर्मित ’’ पारी ’’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण लवकर भातकुडगाव,बक्तरपूर,शहरटाकळी परिसरात करण्यात येणार आहे .