विद्युतवाहक तारेचा धक्का बसून कर्मचार्याचा मृत्यू
पुणे : विजेच्या खांबावर काम करत असताना विजेचा धक्का बसून, महावितरण कर्मचार्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गणेश पांगुळे (28, भूगाव) असे या कर्मचार्याचे नाव आहे. मृत गणेश हे कोथरूडमधील हनुमाननगरमध्ये विजेच्या दुरुस्तीसाठी आले होते. खांबावर जाऊन काम करत असताना त्यांना विजेचा तीव्र झटका बसला आणि ते खाली कोसळले. गणेश यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
