जागतिक शालेय बॅडमिंटन; 14 देशांचे संघ पुण्यात दाखल
पुणे : ढोल-ताशांचा निनाद, घोड्यावरुन निघालेली खेळाडूंची शोभायात्रा, परदेशी खेळाडूंचे केलेले औक्षण, कथक नृत्यातून सादर झालेली गणेशवंदना, चिमुकल्यांनी सादर केलेली जिम्नॅस्टीकची प्रात्यक्षिके अशा जल्लोषपूर्ण वातावरणात जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन झाले. कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये बॅडमिंटन खेळात सुवर्णपदक पटकाविणारा चिराग शेट्टी याच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघ, दिल्लीच्या वतीने जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.
