भोयरे गांगर्डा मध्ये सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इ. 7 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मंदा साबळे या होत्या. यावेळी 7 वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. इयत्ता 1 ली ते 6 वीच्या विद्यार्थ्यांनी 7 वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. इ. 7 वीच्या विदयार्थ्यांनी शाळेसाठी जिजाऊचा फोटोफ्रेम भेट म्हणून दिला.
मुख्याध्यापिका मंदा साबळे यांचेसह सर्व शिक्षकांंनी विदयार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणास शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. इ. 7 वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भोजनाचे नियोजन केले होते. मुख्याध्यापिका साबळे व सुषमा धामणे यांनी इ. 7 वीतील सर्व विदयार्थ्यांसाठी पेन भेट म्हणून दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विदयार्थी सुयोग गायकवाड याने तर आभार सुषमा धामणे यांनी मानले.

Post Comment