Breaking News

मंथन परिक्षेत भांबोरा शाळेचे यश

कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2018 मध्ये घेतलेल्या मंथन प्रज्ञाशोध परिक्षेत चांगले यश मिळविले आहे.या परिक्षेत इ. 3 री तून ऋषीकेश संदेश भारती 256 गुण मिळवून भांबोरा केंद्रातून प्रथम. तर सार्थक शरद लोंढे 224 गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले . इ.4 थीमधून समृध्दी शहाजी वागसकर हिने सलग तिसर्‍या वर्षी 252 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. या सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पालक, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.