Breaking News

भांबोऱ्यात हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता


कर्जत प्रतिनिधी - तालुक्यातील भांबोरा येथील हरिनाम सप्ताहाची नुकतीच मोठ्या उत्साहात सांगता झाली. येथील प्रसिध्द व जाग्रुत हनुमान मंदिर आहे. या हनुमान मंदिराचे वैशिष्ट असे, की या मंदीराच्या डोक्यावर छत नाही. त्याचप्रमाणे उजनी धारणाच्या फुगवटयाचे पाणी या मंदीराच्या पायरीपर्यंतच लागते.

येथील हनुमान मुर्तीच्या चारही बाजुने केवळ भिंती उभ्या आहेत. या भिंतीवर छत टाकण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी अनेकदा केला. पंरतु छत टाकले की ते कोसळते, असा ग्रामस्थांचा आजवरचा अनुभव आहे. तसेच या मंदीरासमोरील इतर मंदिरावर स्लॅब टाकलेला आहे. महत्वाचे म्हणजे या मंदिरास दरवाजा नाही. भांबोरा व परिसरात या हनुमान मंदिराची ख्याती पसरलेली आहे.