अवैध कत्तलखान्यावर छापा
याबाबाबत सविस्तर माहिती अशी की, झेंडीगेट परिसरातील शनिवार दि. २१ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एका दुकानामध्ये कोतवाली पोलिसांनी छापा टाकत गोवंशीय जनावरांचे मांस बाळगल्याप्रकरणी शहेबाज नसिर कुरेशी (वय २५, रा. सबजेल चौक) व मुन्ना बाबु कुरेशी (रा. झेंडीगेट, नगर) या दोघांवर पो.कॉ. रविंद्ग घुंगासे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून तेथून २०० किलो वजनाचे व २४ हजार रुपये किंमतीचे गोमांस जप्त केले आहे
