Breaking News

सहकार चळवळीने शेतीची प्रगती : आ. थोरात


संगमनेर,  1965 ते 1990 चा काळ हा शेतीसाठी खूप महत्वाचा ठरला.सहकारी चळवळ फोफावल्यानंतरच्या 25 वर्षांत शेतीची खूप प्रगती झाली.आज जेव्हा हरितक्रांतीची चर्चा होते आणि किटकनाशक फवारणी करणार्‍या 70 शेतकर्‍यांचा जीव जातो.तेव्हा पुन्हा एकदा नवा विषय हातात घेवून काम करावे लागेल असे वाटते.कीटनाशक विरहीत अन्न हाच विषय यापुढे घ्यावा लागेल असे मत रायाचे माजी कृषीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

शारदानगर येथे पद्मश्री अप्पासाहेब पवार प्रयोगशील शेतकरी पुरस्काराचे वितरण माजी कृषीमंत्री आमदार थोरात यांच्या हस्ते झाले.त्याप्रसंगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार होते.यावेळी ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार,विश्‍वस्त सौ.सुनंदा पवार,विश्‍वास देवकाते,नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे,संजय भोसले,विजय बोराडे,डॉ.व्यंकट मायंदे,डॉ.नारायण हेगडे,अशोक गायकवाड,डॉ.एस.एन.जाधव, डॉ.सुदाम अडसूळ,डॉ.शंकरराव मगर,राजीव देशपांडे,रणजित पवार, डॉ.अविनाश बारवकर,विष्णुपंत हिंगणे आदि मान्यवर उपस्थित होते.