Breaking News

कुटुंब अर्थसाह्य योजनेत लाभार्थी महिलांना धनादेश

प्रतिनिधी । शेवगाव :- राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजनेंर्तगत तालुक्यातील पाच लाभार्थी महिलांना प्रत्येकी २० हजार रुपयांप्रमाणे एक लाखांच्या अनुदानाचे वाटप आ. मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. कुटुंबप्रमुखाचे निधन झाल्यानंतर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजनेंर्तगत त्याच्या पत्नीला २० हजारांचे अनुदान देण्यात येते. 

यामध्ये छाया अशोक लवांडे, माया काळूराम बंसवाल, शारदा दीपक गोर्डे, दहिगावने येथील अलका केशव घोडके व माळेगावने येथील कमल महेश भिसे यांना तहसील कार्यालयात धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार दीपक पाटील, नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ, ज्ञानेश्‍वर धाडगे, भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, नगरसेवक अरुण मुंढे, नितीन दहिवाळकर, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, जलिल राजे, आत्माराम कुंडकर, कैलास सोनवणे आदी उपस्थित होते.