Breaking News

‘न्यायव्यवस्था सरकार व कायदेमंडळाशी जुळलेली’

नागपूर : न्यायव्यवस्था ही सरकार व विधिमंडळाशी अपरिहार्यपणे जुळलेली आहे, असे मत न्यायमूर्ती जस्ती चेलमेश्‍वर यांनी व्यक्त केले. दिवंगत एन. एल बेलेकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. न्यायव्यवस्था ही घटनात्मक प्रशासनाचा भाग आहे. ती अपरिहार्यपणे सरकार व कायदेमंडळाशी जुळलेली आहे. कोणत्याही व्यवस्थेचे यश त्या व्यवस्थेच्या यशस्वी अंमलबजावणीवर अवलंबून असते, असेही चेलमेश्‍वर यावेळी म्हणाले. जानेवारी महिन्यात ऐतिहासिक पत्रकार परिषद घेणार्‍या चार न्यायमूर्तींपैकी न्यायमूर्ती चेलमेश्‍वर एक आहेत. न्या. मदन लोकुर, न्या. कुरैन जोसेफ, न्या. रंजन गोगोई आणि न्या. जस्ती चेलमेश्‍वर यांनी न्यायव्यवस्थेचे रक्षण करण्याचे आवाहन पत्रकार परिषदेद्वारे केले होते.