Breaking News

उन्हातान्हात फिरून उभी केली १ लाख ३० हजारांची मदत


सध्याच्या संगणक आणि फेसबुक, व्हाट्सअपच्या युगात ‘संस्कारक्षम शिक्षण’ हे केवळ कागदावरच राहते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या पाठीशी असलेले प्रामाणिक शिक्षक तसेच सूज्ञ पालकांचे हात आणि महत्वाचे म्हणजे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतून जपला जाणारा 'एकमेका साहाय्य करू… अवघे धरू सुपंथ!' हा वस्तूपाठ निश्चितच प्रेरणादायी म्हणावा लागेल. लोणीच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात द्वितीय वर्ष बीएस्सी वर्गात शिकणारी तालुक्यातील आडगावच्या निलम पवार या विद्यार्थिनीला दुर्मिळ आजार जडला. अर्थात प्रचंड वैद्यकीय खर्च ठरलेलाच असतो. परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्या मैत्रिणींनी उन्हातान्हात फिरून १ लाख ३० हजार एवढी प्रचंड आर्थिक मदत उभी केली. ‘प्रवरा’त शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे समाजातल्या सर्व थरातून कौतुक होत आहे.

ही एप्लास्टिक अँनेमिया या दुर्मिळातल्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे तिच्यावर नाशिक येथील लोट्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिच्या पालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने मोठा वैद्यकीय खर्च ते पेलवू शकत नसल्याने तिच्या वर्गातील सहकारी मित्र मैत्रिणींनी गेल्या चार पाच दिवसापासून सध्याच्या रणरणत्या ऊन्हातान्हात फिरून नागरिकांना मदतीचे आवाहन केले त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने साधारण यासंदर्भात दैनिक लोकमंथनने दिनांक ११ एप्रिलच्या अंकात आपली सामाजिक बांधिलकी जपत सर्वप्रथम 'त्यांच्या मैत्रिणे ग्रामस्थांचेही डोळे पाणावले' या मथळ्याखाली विद्यार्थ्यांच्या मदत फेरीचे सचित्र व्रुत्त प्रकाशित केले होते या व्रुत्ताचेही सर्व थरातून कौतुक होऊन कु निलमला मदतीचा हात देण्याची तयारी दर्शविली आहे हे व्रुत्त प्रकाशित करुन सामाजाप्रती असलेली नाळ आणखी घट्ट केल्याचे व संदेश दिल्याच्या प्रतिक्रिया निलमच्या शिक्षकांसह विविध समाजघटकांनी लोकमंथनला दिल्या आहेत

पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयानेही निलमच्या उपचारासाठी निधी जमा करण्यासाठी कबर कसली असून प्राध्यापकांनीव महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदवत भरिव व प्रत्यक्ष मदतनिधी जमा केला आहे तर दैनिक लोकमंथन मधील व्रुत्त वाचून इतर महाविद्यालयांनीही मदतीचे आश्वासन दिल्याचे व्यवस्थापनाने सांगितले त्याचप्रमाणे पुणे विद्यापिठाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या निधीतून मदतनिधी मिळविण्याचा प्रयत्न महाविद्यालय स्तरावर सुरू आहे निलमच्या वर्गातील सहकारी विद्यार्थ्यांनी सलग चारपाच दिवस उन्हातान्हात फिरून आजवर जवळपास१ लाख ३० हजाराचा निधी जमा केला असून तो निलमच्या पालकांकडे सुपूर्द केला आहे गावागावात त्यांनी भित्तिपत्रके डकवून नागरीकांना मदतीचे आवाहन केले आहे याकामी प्रशांत बाहुले, नईम शेख, दिपक दौंड, ऋषीकेश पाटील, मनिषा आहेर, प्रियंका घोलप, योगेश शिंदे, योगेश पोकळे, पुजा माळवे, दिप्ती तांबे, स्वाती वाघमारे, सायली पाबळे, ऋषीकेश उफाडे, सागर घोरपडे, कुणाल काकडे, विशाल घोरपडे विद्यार्थी परिश्रम घेत असून समाजातील दानशूर व्यक्तिंनी पुढे येऊन निलमला मदत करण्याचे आवाहन केले आहे मदत करू इच्छिणाऱ्यांनी ८६००९३०९३१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे