Breaking News

सलग तीन दिवसांपासून पारा 42.1 वर



सोलापुरात तीन ते चार दिवसांपासून तापमान स्थिरावले आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात कोरडे हवामान आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. त्याच तुलनेत सोलापुरातही वाढ जैसे थे होती. मात्र गेल्या काही दिवसापासून 41.6 एवढ्या तापमानाची नोंद झाली. 

2 मे पर्यंत तापमान 41 ते 42 अंश सेल्सियसच्या दरम्यानच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एप्रिलमध्ये 42.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. 22 ते 25 एप्रिलपर्यंत 42.1 एवढ्या तापमानची नोंद आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये 43.8 अंशाची नोंद होती. यंदाच्या वर्षी 1.6 अंश कमी तापमानाची नोंद झाली आहे. सगळ्यात जास्त चंद्रपूरचे तापमान 44 अंशावर आहे. तिसर्‍या स्थानावर सोलापूर व बीडचे तापमान आहे.