Breaking News

सागरमाला, जीएसटी, उडानमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची भरभराट : डॉ. व्ही. के. सिंग

मुंबई : भारताच्या भौगौलिक आर्थिक संचरनेमध्ये ‘गेटवे ऑफ इंडियाच्या संवाद विकासाचा खूप मोठा वाटा आहे. असे मत परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री डॉ. व्ही. के. सिंग यांनी व्यक्त केले. ‘गेटवे ऑफ इंडिया भौआर्थिक संवाद परिषदेच्या तिसर्‍या पर्वामध्ये ते बोलत होते. मुंबई येथील ‘गेटवे हाऊस आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. ‘डिझायनिंग इंडियाज ग्लोबल इकॉनॉमिक एंगेजमेंट हे या परिषदेचे सूत्र होते. डॉ. सिंग आपल्या भाषणामध्ये पुढे म्हणाले, ‘केंद्र सरकारने याआधीच अनुसरलेला पारदर्शी कारभार, चांगला संवाद आणि संपर्काचा लाभ जागतिक अर्थव्यवस्थेला होणार आहे. यापरिषदेमधून पुढील काळात जे काही बाहेर पडणार आहे, त्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.

‘संरक्षणवादाची मोठी आव्हाने समोर असूनही 7 ते 7.5 टक्क्यांएवढा विकास दर भारतासाठी लाभदायक ठरला आहे. भक्कम निर्मितीचे क्षेत्र, मुक्त आणि डिजिटाइज्ड अर्थव्यवस्था आणिउत्तम संपर्कामुळे आपल्या आत्मविश्‍वासात भर पडली आहे. देशभरातील मोठी बंदरे सागरमालाप्रमाणे विकसित केली जात आहेत. त्याचा लाभ सागरी वाहतूक व ृद्धीसाठी झाला आहे.त्याप्रमाणेच ‘भारतमाला प्रकल्पाशी जमिनीवरून होणार्‍या संपर्कात आता वाढ झाली आहे. जीएसटीमुळे व्यवसाय तसेच आर्थिक घडामोडी वाढल्या असून सेवांमध्ये सुसूत्रता आली आहे. ‘उडान-उडे देश का आम नागरीक या योजनेमुळे देशातील स्थानिक हवाई यंत्रणा अधिक विस्तारली आहे. तसेच छहाबार बंदरामुळे अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील देशांबरोबरच्या संपर्कात वाढ झाली आहे.
‘जगात सध्या सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचे नाव घेतले जात आहे. त्याप्रमाणेच देशातील ‘थिंक टँक म्हणून ‘गेटवे हाऊससारख्या संस्थेक डे पाहिलेजात आहे. ही संस्था सध्या जगभरातील आघाडीच्या तज्ज्ञांबरोबर काम करीत आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. आपल्याव्हिडीओ संदेशाद्वारे ते म्हणाले, ‘सर्व विचारवंत आणि भागधारकांबरोबर केंद्र सरकार काम करणार आहे. या परिषदेस माझ्या शुभेच्छा असून तिचा लाभ भारतामध्ये होणार्‍या चांगल्या कामाच्या प्रसिद्धीसाठी व्हावा. या परिषदेमध्ये सहभागी होणारी मंडळी उद्या चीनचे भारताबरोबरचे नाते, जागतिक व्यापारात सेवाप्रक्रियांचे वाढलेले महत्त्व, जागतिक आ र्थिक व्यवहारा जी-20 देशांची भूमिका,डिजिटल तंत्रज्ञानाचे नियमन तसेच सागरी उत्पन्नामुळे विविध देशांमध्ये होणार्‍या स्पर्धेबाबत चर्चा करणार आहेत. इस्टोनियामध्ये सध्या  भारतीय नागरिकत्व असलेले एक हजार नागरीक आहेत. डिजिटल सोसायटी निर्मितीमध्ये भारताची वाटचाल सुरू असतून त्यामध्ये आमचा सहभाग राहील, असे मत इस्टोनियाचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री उर्वे पालो यांनी व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, ‘पंधरा वर्षांपुढील नागरिकांसाठी एक विशेष कोड निर्माण केल्यामुळे देशातील 99 टक्केसेवा ही आ ॅनलाइन झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सायबरस्पेस, इ-इस्टोनिया हे येथील शासनाचे भविष्य आहे.
उर्वे पालो आणि डॉ. व्ही. के सिंग यांच्यासारखे मान्यवर या परिषदेमध्ये सहभागी झाल्याचा गेटवे हाऊसला आनंद आहे. डिजिटल अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेमधील सुधारणा यावरया मान्यवरांनी भाष्य केले, असे मत गेट वे हाऊसचे कार्यकारी संचालक आणि सहसंस्थापक मनजीत कृपलानी यांनी व्यक्त केले. उद्याच्या चर्चासत्रात या मंडळींचे विचार आणिकल्पना अधिक ठळक स्वरूपात आपल्या समोर येतील, असेही ते म्हणाले.