Breaking News

काजूसह मसाला पिके आणि नारळ प्रक्रिया उद्योग नायजेरियाच्या वाटेवर

सिंधुदुर्गनगरी, दि. 14, मार्च - आमच मुख्य पिक काजू असूनही जवळपास 90 टक्के काजू आम्ही इतर देशांना प्रक्रिया न करता पाठवतो. कोकणात घराघरात काजू युनिट असल्याने अशाच प्रकारे या उद्योगाची माहिती आमच्या नायजेरिया या देशातील जनतेला द्यायची आहे. त्याचं प्रमाणे मसाला पिकाच्या उत्पादनातून काजुमध्ये आंतरपीक म्हणून मिरीची लागवड करायची आहे. नारळ प्र क्रिया उद्योगाची माहिती घेण्यासाठी सिंधुदुर्गात आम्ही आलो असल्याची माहिती नायजेरिया या देशातील जीबॅको या भागाचे नगराध्यक्ष जॉन तमन यांनी मालवण तालुक्यात मसुरे येथे पत्रकारांशी बोलताना दिली. या पथकाने सावंतवाडी आणि वेंगुर्लेत काजू आणि नारळ प्रक्रियेची माहिती घेतली. 

मालवण तालुक्यात बांदिवडे येथील मिलिंद प्रभू यांच्या मिरी लागवड क्षेत्रास भेट दिल्यांनतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत अगवाराचे नगराध्यक्ष जाफरा मोहम्मद, आयेडाचे चेअरमन मुसा बावा, आयेडाचे समन्वयक ओके बेकुरे आदी तिघेजण खास नायजेरियातून अभ्यास दौर्‍यासाठी उपस्थित राहिले आहेत. काजुवर होणार्‍या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात रोजगार नायजे रियात निर्माण करणे शक्य आहे. त्यासाठी सिंधुदुर्गातून प्रशिक्षित माणसे, मशनरी, तंत्रज्ञ यांची गरज या देशाला लागणार आहे. ही टीम आपला अहवाल नायजेरियाच्या सरकारला देणार असुन त्यांतर हे तंत्रज्ञान नायजेरियात विकसित केल जाणार आहे. कुटिरोद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याबरोबरच भविष्यात भारतात काजू आयात करता येणे सुद्धा सोपे होणार आहे. मिलिंद प्रभू यांनी मिरी हे आंतरपिक घेताना इतर मसाला पिके सुद्धा या लागवड क्षेत्रात घेतली आहेत. यातून उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच संपूर्ण क्षेत्राचा वापर करता येणे शक्य आहे. ही एचडी फार्मिंगची संकल्पना नायजेरिया देशात प्रत्यक्षात आणायची आहे, अशी माहिती यावेळी आयेडाचे चेअरमन मुसा बावा यांनी दिली.
गावागावात पोचलेले रस्ते आणि प्राथमिक सुविधा आणि निसर्गरम्य परिसर पाहून दुसरा सिंधुदुर्ग नायजेरियात निर्माण झाला पाहिजे. येथील प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी असुन आमच सरकार या सर्व गोष्टी शिकण्यासाठी सकारात्मक असल्याचे प्रतिपादन यावेळी अगवाराचे नगराध्यक्ष जाफरा मोहम्मद यांनी केले. आमच्या अहवालानंतर आणखी 25 नगराध्यक्षांची टीम सिंधुदुर्गात अभ्यास दौर्‍यासाठी येणार आहे. त्यानंतरच या सर्व गोष्टीवर अंतिम निर्णय होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत नारळ पिक तज्ज्ञ विनय सामंत, डॉ. सुहास आचरेकर, अरुण भट, संतोष घाडीगावकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. नायजेरियाच्या टीमने मिलिंद प्रभू यांच्या नर्सरी, बुश तंत्र आदीची माहिती घेतली. तसेच अरुण भट यांच्या क्षेत्रावर भेट देवून पाहणी केली.