Breaking News

स्पर्धा परीक्षेच्या तणावातून तरूणीची आत्महत्या

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये एका तरूणीने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱया तरूणीचे नाव प्रिती जाधव असे असून, ती मुळ बीडची आहे. प्रिती ही मागील दोन वर्षापासून चिंचवडच्या साई पूजा लेडीज हॉस्टेलमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असे. मात्र, ती स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या तणावात आली होती, असे तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत नमुद केले आहे. तिच्या सोबत इतर चार मुलीही राहत होत्या, आज सकाळी त्या सर्व कामावर गेल्यानंतर तिने गळफास घेवून आत्महत्या केली.