जालना : पाचशे रुपयाच्या बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले. सदर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केली. शेख हमीद शेख युसूफ व मोहन जयस्वाल या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हमीद आणि मोहन या दोघांनी 500 रुपयाच्या 91 बनावट नोटा चलनासाठी बाजारात आणल्या असल्याची गुप्त मा हिती स्थानिक गुन्हे अन्वेषण मिळाली. यानंतर पोलिसांनी हमीदची झडती घेतली असता त्याच्याजवळ 500 रुपयाच्या 7 बनावट नोटा मिळाल्या. या बनावट नोटा मोहनकडून आणल्याची माहिती हमीदने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी मोहनची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडून 20 हजारांच्या 84 नोटा आढळल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या.
बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी दोन जण ताब्यात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:09
Rating: 5