Breaking News

वडिलोपार्जित जमिनीच्या वादाने घरात घुसून मारहाण

जामखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील जांलीदर दगडू घुगे व पत्नी मलकाबाई घुगे यांना दि. 1 मार्च रोजी रात्री 10.30 वा. विलास दगडू घुगे तसेच त्यांचे 2 मुलं बापू व अभिमान घुगे यांनी घरात घुसून मारहाण करत, जखमी केल्याची तक्रार फिर्यादी जांलीदर घुगे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दिली.


याबद्दल सविस्तर माहिती अशी की, दि.1 मार्च रोजी रात्री 10.30 वा. फिर्यादी जांलीदर दगडू घुगे, पत्नी मलकाबाई घुगे व घरातील सर्व कुटुंबासमवेत असताना तक्रारीतील आरोपी विलास दगडू घुगे हा फिर्यादी जांलीदर दगडू घुगे यांचा मोठा भाऊ आपल्या बापू व अभिमान या मुलांसह फिर्यादीच्या आनंदवाडी येथील राहत्या घरी आला व त्याने फिर्यादी जांलीदर दगडू घुगे तसेच पत्नी मलकाबाई घुगे सह कुटुंबातील इतर व्यक्तींना पुर्वीच्या शेतजमीनीच्या कारणावरून लाठी, काठी, दगडाने जबर मारहाण करून फिर्यादीस व फिर्यादीच्या पत्नीस गंभीर स्वरूपाची जखम करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या असणार्‍या वडलोपार्जित शेतजमीनीतील तुला हिस्सा देणार नाही तसेच आनंदवाडी गावात राहून देणार नाही. राहील्यास तुला ठार मारीन अशा स्वरूपाची दमबाजी करून दहशत निर्माण केली, अशी तक्रार जांलीदर दगडू घुगे (वय 47) रा. आनंदवाडी तालुका जामखेड याने जामखेड पोलिस स्टेशनला दिली असुन या संदर्भात मारहाणीची एनसी फिर्याद जामखेड पोलिसांनी दाखल केली असून फिर्यादीस व त्यांच्या पत्नी मलकाबाई घुगे यांना ग्रामीण रूग्णालय येथे उपचारासाठी पाठविले आहे. या संदर्भात फिर्यादी व पत्नीसह कुटुंबातील सर्वांनी अधिक माहिती दिली. जामखेड पोलिस या संदर्भातील तपास करीत असुन फिर्यादी जांलीदर घुगे हा कुटुंबासह गाव सोडून भिती पोटी जामखेड येथील आपल्या भावाकडे आला असून न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.