Breaking News

कोल्हापूर : दुमजली घरासह जनावरांच्या गोठ्याला आग; म्हशीचा होरपळून मृत्यू


कोल्हापुरातील न्यू शाहुपुरी परिसरातील पाटणकर कॉलनी येथील जुन्या दुमजली घरासह जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागली घटना घडली आहे. या आगीत म्हशीचा होरपळून मृत्यू झाला असून एक गाय जखमी झाली
आहे. 

शॉर्ट सर्किटमुळे ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी एकच्या सुमारास ही आग 
लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन चार बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणली. घराला लागुन असलेल्या सर्जेराव श्रीपती बनसोडे यांच्या दोन खोल्याही या आगीत जळाल्या असून तब्बल 15 लाखाहून अधिक किंमतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.