Breaking News

गोवंडीमध्ये गोडाऊनला भीषण आग


मुंबई, गोवंडीतील महाराष्ट्र कम्पाऊंडमध्ये असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अथक प्रयत्न करत आहेत.

 गोवंडी रोडवरील आयशा हॉलच्या बाजूला असलेल्या गोडाऊनला दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली आहे. आग विझविण्यासाठी 8 फायर इंजिन, 4 जे.टी व 2 वॉटर टँकर घडनास्थळी दाखल झाले आहेत.