Breaking News

दुर्वांकूर चौकात प्रिंटर टोनर रिफिलिंगच्या दुकानाला आग


पुणे  - पुण्यातील टिळक रोडवरील दुर्वांकूर चौकात प्रिंटर टोनर रिफिलिंगच्या दुकानाला अचानक आग लागली. दुकान बंद असल्याने सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान, अग्नीशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले आहे. दुर्वांकूर चौकात ए 1 रिफिलिंग कॉम्प्यूटर सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिस प्रिंटर कंझ्युमर ऑल टाईप ऑफ कार्टरेज रि फिलिंगचे दुकान आहे. दुकानाला अचानाक आग लागली. नागरिकांनी याची माहिती अग्निशामक दलाला कळवताच तातडीची कारवाई करत एका बंबच्या सहाय्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने दुकान बंद असल्याने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेत दुकानाची एक बाजू आणि आणि साहित्य जळाले आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज अग्निशामक दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे.