Breaking News

यात्रा समितीच्या अध्यक्षपदी सुरेश शेटे

राहुरी:  येथील खंडोबा यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुरेश रघुनाथ शेटे तर उपाध्यक्षपदी गोरक्षनाथ नाथू चव्हाण, अमोल अशोक तनपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामदैवत खंडेराया महाराजांची यात्रा १ ते ४ एप्रिल या कालावधीत भरणार आहे. यात्रा उत्सव नियोजन तसेच कमेटीच्या पदाधिकारी निवडीसाठी काल शहरातील हनुमान मंदीरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक गणपतराव उंडे होते. राजेंद्र वाडेकर, शिवाजी वराळे, अशोक वामन, कांतीराम वराळे यांनी चर्चेत सहभाग घेतला. सदाशिव शेळके, आबासाहेब भुजाडी, विजय भुजाडी, विलास वराळे, संजय भुजाडी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.