Breaking News

मोशीत गुजरातवरुन आणलेला कोट्यवधींचा गुटखा पकडला


पुणे - पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात पोलिसांनी गुटख्याच्या पोत्यांनी भरलेले चार ट्रक जप्त केले आहेत. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले. या गुटख्याची किंमत कोट्यवधी असल्याचे सांगितले जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी हा माल जप्त केला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यामध्ये अजून काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.आळंदी येथील गुटख्याच्या व्यापारी पंकज बलदोटा व बोरूंदीया या दोघांचा माल असून हा गुटखा गुजरात येथून पुणे जिल्हा व शहरात विकण्यासाठी आणला जात होता. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने व अन्न व औषध प्रशासननाच्या अधिका-यांनी केली आहे.