Breaking News

देवगाव येथील आश्रम शाळेतील आठ मुलींना विषबाधा

नाशिक, दि. 29, मार्च - त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील देवगावं गावातील शासकीय आश्रम शाळेतील आठ मुलींना विषबाधा झाल्याची घटना घडली. विषबाधा कोणत्या कारणामुळे झाली याचे कारण मात्र अद्याप समजले नाही. सदर घटनेची माहिती समजताच श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी विषबाधा झालेल्या मुलींना तात्काळ इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.


आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली. देवगाव आश्रमशाळेत एकही कर्मचारी शिक्षक मुख्यालयात हजर नसल्याने श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुलींना रुग्णालयात दाखल केले. इयत्ता तिसरी ते सातवी पर्यंत शिक्षण घेणार्‍या साक्षी अस्वले, ज्योती वारे, नंदिनी जाखेरे, चिऊ सराई, शकुंतला गोहिरे, मंजुळा हंबीर, निर्मला पारधी , कमल गोहिरे, अशी मुलींची नावे आहेत.