Breaking News

महाविरांच्या पालखीचे काळे यांच्या हस्ते पूजन


कोपरगाव ता. प्रतिनिधी - कोपरगाव शहरात मोठया भक्तीपूर्ण उत्साहात भगवान महावीरांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सजविलेल्या पालखीतून भगवान महावीरांची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी भगवान महाविरांच्या प्रतिमेचे व पालखीचे विधिवत पूजन करून जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक मंदार पहाडे, विरेन बोरावके, सुनील शिलेदार, हिरामण गंगूले, जैन समाजाचे पंच संतोष गंगवाल, चंद्रकांत कासलीवाल, तुषार बागरेचा, अजित लोहाडे, दिलीप अजमेरे तसेच सर्व समाजाचे ट्रस्टी व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.