Breaking News

सावळीविहीर येथे महावीर जयंती उत्साहात

शिर्डी/प्रतिनिधी - राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथे भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भगवान महावीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात सावळीविहीर, निमगाव, निघोज, रुई येथील जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. 


सावळीविहीर येथील जैन स्थानक ते भगवान दिगंबर जैन मंदिरापर्यंत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान महिलांनी दांडीया व गरबा नृत्य सादर केले. सरपंच रुपाली आगलावे यांनी प्रतिमेचे पूजन केले. जैनश्रावक संघाच्यावतीने कल्पना बाठीया यांनी आगलावे यांचा सत्कार केला. यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप बाठीया, संघपती मानकचंद कोठारी, उपाध्यक्ष विजय पिपाडा, नवकार युवक संघाचे अध्यक्ष मनोज कोठारी, उपाध्यक्ष वैजयंत बाठीया, भरत संघवी, रमेश डुंगरवाल, प्रकाश गांधी, मानक लोढा, शांतीलाल लोढा, सुभाष कोठारी, वैभव बाठीया, अमित डोशी, बाळू पिपाडा, जोगेष लोढा, पुनम गांधी, इंदर लोढा, पंकज लोढा, विजय गांधी, राजेंद्र भनसाळी, विजय चोपडा, मदनशेठ भंडारी, बाळासाहेब जपे, सोपान पवार, संतोष आगलावे, चंद्रशेखर जपे आदींसह जैन बांधव उपस्थित होते. गौतम प्रसादी सुवालाल खाबीया यांनी आभार मानले.